म्हणे…रामायण काळात टेस्ट ट्यूब बेबी; यू.पी चे उपमुख्यमंत्री बरगळले

लखनऊ : वृत्तसंस्था

मागील काही दिवसापासून भाजपामधील अनेक खासदारांसह मंत्र्यांना देखील पुराणातील काव्यावरुन विविध प्रकारचे साक्षात्कार होताना दिसत आहेत. कोण म्हणतं रामायानातील पुष्पक विमान हा त्या काळच्या विज्ञानाचा अविष्कार तर कोण म्हणतं नारद हे पहिले सुपर संगणक. आत उत्तर प्रदेशातील उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी देखील आपली हुशारी दाखवत रामायण काळात देखील टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी देखील भाजपच्या अनेक नेत्यांनी रामयण, महाभारतावरुन केलेल्या वक्तव्यामुळे आपली चांगलीच फजिती करुन घेतली आहे. आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्र्यांची यामध्ये नव्याने भर पडली आहे. या वक्तव्याने सोशलमिडीयावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बाोलताना दिनेश शर्मा म्हणाले की, आज जे काही लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. मात्र मला वाटते की असेच तंत्रज्ञान महाभारतकाळातही अस्तित्वात होते. संजयाने आपल्या दिव्यदृष्टीने रणांगणावर घडणाऱ्या घटनांचे वर्णन धृतराष्ट्राला सांगितले होते. लोक म्हणतात की रामायण काळात पृथ्वीच्या पोटातून सितेचा जन्म झाला. याचा अर्थ त्यावेळी टेस्ट ट्यूब बेबीसारखे तंत्रज्ञान अस्तित्वात असले पाहिजे असे वक्तव्य दिनेश शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्र्यांनी देखील महाभारत काळात इंटरनेट असल्याचा तसेच सॅटेलाईट कम्युनिकेशनचा दावा केला होता. त्यांनंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.