पुरुषांमध्ये ‘टेस्टोस्टेरॉन’च्या कमतरतेमुळं होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार ! जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पुरुषांमधील महत्त्वाचा हार्मोन म्हणून ओळखला जाणारा टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असतो. पुरुषांमधील लैंगिक क्षमताही यावर अवलंबून असते. परंतु याचा स्तर कमी झाला तर पुरुषांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. जसं की, डायबिटीज, हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, थकवा येणं. अनियमित आहार आणि बदलत्या लाईफ स्टाईलमुळंही कमी वयात मुलांना आजारांना सामोरं जावं लागतं.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन एड्रेनल ग्लँडमार्फत तयार होत असतं. याच्याच स्तरावर यौनक्रिया, मांसपेशी, केसांची वाढ अवलंबून असते. पुरुषांमध्ये चाळीशीनंतर याचा सतर कमी होताना दिसतो.

टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळं काय परिणाम होतो ?

1) स्नायू आणि हाडं कमकुवत होतात

2) हाडांमध्ये वेदना

3) लवकर थकवा येतो

4) ताण-तणाव वाढतो

5) सतत चिडचिड होते

6) लैंगिक संबंध ठेवण्याची क्षमता आणि इच्छा कमी होते

अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्यानं पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्समध्ये कमतरता येते. काही शोधांमधून असंही समोर आलं आहे की, नशा करणाऱ्या पुरुषांचं शरीर 50 टक्केच टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं. काही पदर्थांचं सेवन करून तुम्ही याची पातळी चांगली ठेवू शकता.

टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली रहाण्यासाठी काय कराल ?

1) संतुलित आहार घ्या

2) नाश्त्यात अंडी, हिरव्या भाज्या आणि शेंगदाण्याचं सेवन करू शकता.

3) ज्या आहारातून झिंक आणि मॅग्नेशियम असे खनिज मिळतील अशा पदार्थांचं सेवन करा.

4) काब्रोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळं याचा स्तर कमी होतो.

5) नियमित व्यायाम करा. यामुळं विषारी पदार्थ बाहेर पडतात. तुम्ही तरुण दिसता. शरीराची लवचिकता वाढते.

6) गोड पदार्थ खाणं कमी करा. यामुळं शुगर वाढते. परिणामी शरीरातील इंसुलिनचं प्रमाण वाढतं. यामुळं टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. म्हणून गोड खाणं टाळावं.