शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) मर्यादा आता आयुष्यभर करण्यात आली आहे. याचा फायदा शिक्षकी पेक्षा निवडणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. यापूर्वी प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षासाठी होती. मात्र, आता ही वैधता संपुष्टात आणली आहे. 7 वर्षाच्या कालावधीत उमेदवाराला नोकरी लागली नाही, तर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. आता या निर्णयामुळे इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टीईटी प्रमाणपत्राची (TET Certificate) वैधता वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली.
केंद्रीय मंत्री म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना शिक्षण क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना नवे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच 2011 या वर्षानंतर ज्या उमेदवाराचे शिक्षण पात्रता प्रमाणपत्र समाप्त झाले आहे. अशांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

यापूर्वी 7 वर्षांची वैधता होती

 

सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता केवळ 7 वर्षांची होती.
एखाद्याने 2011 मध्ये परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे 2018 पर्यंतच वैध राहत होते.
मात्र आता प्रमाणपत्र आयुष्यभर वैध राहणार आहे.

HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

PF खातेदारांना अकाऊंटवर मिळतात ‘या’ 5 सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’?, राजकीय वर्तुळात चर्चा

Corona Vaccination : देशात कोरोना लसींची टंचाई असल्यानं मोदी सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात