TET Exam 2021 | टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा बदलली, जाणून घ्या नवीन तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा (TET Exam 2021) पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (State Examination Council) सुधारित वेळापत्रक (Revised schedule) जाहीर केले आहे. राज्यात 30 ऑक्टोबर रोजी टीईटी (TET Exam 2021) म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या दिवशी देगलूर-बिलोली विधानसभा (Deglaur-Biloli Assembly) मतदारसंघाची पोटनिवडणूक (By-election) आल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

 

याआधी टीईटी परीक्षा (TET Exam 2021) 10 ऑक्टोबरला घेतली जाणार होती.
मात्र, त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु याआधीच या दिवशी आरोग्य विभागाची परीक्षा (Health department exam) घेतली जाणार आहे. त्यामुळे टीईटीची परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेऊन सुधारित वेळापत्र जारी करण्यात आले. मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्याने तिसऱ्यांदा या परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

 

साधारणपणे टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत.
यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिषदेने केले आहे.
राज्यभरात घेतली जाणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

 

Web Title :- TET Exam 2021 | Maharashtra tet 2021 exam date postponed again to be held on 21 november check official notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Court | पीडित महिलेचं चारित्र्य वाईट आहे असे म्हणून बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या सोडू शकत नाही : उच्च न्यायालय

Bombay High Court | रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी बनवणार की नाही? उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला ‘खडा’ सवाल

WhatsApp | 1 नोव्हेंबरपूर्वी करा ‘हे’ महत्वाचे काम, अन्यथा फोनमध्ये वापरू शकणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या