TET Exam Scam | अश्विन कुमारच्या घरात सापडलं तब्बल 1 कोटीचं ‘घबाड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी रात्री अश्विन कुमार (Ashwin Kumar) याच्या बंगळुरु (Bangalore) येथील घरावर छापा (Raid) टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अश्विन कुमारच्या घरातून मोठ्या प्रमाणात चांदी (Silver), सोन्याचे दागिने (Gold Jewelry), हिरे (Diamonds), जडजवाहीर जप्त केले आहे. या सर्व वस्तूंची मोजदात झाली असून पोलिसांनी एक कोटीहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टीईटी भरती घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) पुणे पोलिसांनी जी ए सॉफ्टवेअरच्या (GA Software) अश्विन कुमार याच्या घरावर शुक्रवारी छापा टाकून सोन्याचे 39 नग, चांदीचे 16 नग, 1480.680 ग्रॅम वजनाचे सोने, 44.74 कॅरेटचे हिरे आणि जडजवाहीर, 85 लाख 20 हजार 326 रुपये किंमतीचे सोन्याची दागिने (हिरे रत्नासह), 16 लाख 75 हजार 479 रुपये किंमतीची 27.023 किलो चांदी असा एकूण 1 कोटी 1 लाख 95 हजार 805 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हा प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) बरोबर काम करत होता. अश्विनकुमार हा जी. ए. टेक्नॉलॉजीज या कंपनीचा प्रमुख आहे. याच कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं.

 

म्हाडाच्या पेपरपुटीचा (MHADA Exam) तपास करताना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (State Education Council Commissioner Tukaram Supe) व अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) या दोघांना सुरुवातीला अटक केली. सुपे याच्याकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात 2018 च्या टीईटी च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

Web Title :- TET Exam Scam | 1 crore found in Ashwin Kumar’s house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SSY | दर महिना जमा करा इतके रुपये, मुलीला मिळतील एकरकमी 65 लाख; जाणून घ्या

Corporator Jyoti Ganesh Kalmakar | विविध अंगांने शहराचा विकास व्हावा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Pune BJP | अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ला प्रभाग 16 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ! 15500 हून अधिक घरांमध्ये संपर्क

Ration Card शिवाय सुद्धा हे लोक घेऊ शकतात सबसिडीचे धान्य, सरकार ‘या’ प्लानवर करतंय काम; जाणून घ्या

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता