TET Exam Scam | टीईटी 2018 परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणात 12 जणांवर 2615 पानांचे दोषारोपपत्र दाखल; 1701 अपात्रांना केले होते ‘पात्र’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam | पुण्यातल्या टीईटी परीक्षा (TET Exam Scam) 2019-20 प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) 15 जणांवर 3955 पानांचे दोषारोप पत्र (Charge Sheet) पुणे न्यायालयात (Pune Court) दाखल केले आहे. यानंतर आता टीईटी 2018 परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) आज (बुधवार) 2615 पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. 2018 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी इतरांशी संगनमत करुन 1701 जणांना पात्र ठरवले होते. याप्रकरणी 12 जाणांवर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare) यांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे.

 

2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात 1 लाख 57 हजार 650 परीक्षार्थी बसले होते. यापैकी 9677 पास झाल्याचा निकाल जाहिर करण्यात आला होता. यामध्ये 817 जण पात्र नसताना देखील त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आले होते. अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी एजंटमार्फत पैसे घेण्यात आले. या अपात्र परीक्षार्थींची नावे मुख्य निकालात समाविष्ट करण्यात आली होती. हा निकाल वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर 884 परीक्षार्थींना पात्र असल्याचे दाखवून खोटा जाहिर केला. टीईटी परीक्षेत आरोपींनी 1701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे दोषारोप पत्रात नमूद केले आहे.

 

राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा ठपका 12 जणांवर ठेवण्यात आला आहे. या 12 जणांविरुद्ध आज न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी 16 आरोपी निष्पन्न झाले असून दोन आरोपींना इतर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी (दि.15) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) 2019-20 प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) दोषारोप पत्र (Charge Sheet) दाखल केले आहे.
3955 पानांच हे दोषारोप पत्र पुणे न्यायालयात (Pune Court) दाखल करण्यात आलं आहे.
या प्रकरणी तुकाराम सुपे (Tukaram Supe), सुखदेव ढेरेसह (Sukhdev Dhere) 15 आरोपी अटकेत (Arrest) आहेत.
मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणात अजून 12 आरोपी फरार आहेत.
हे दोषारोप पत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (First Class Magistrate Shraddha Dolare) यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

 

काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य भरतीच्या परीक्षेत (Health Recruitment Exam) पेपर फुटीचे प्रकरण उजेडात आले.
या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करुन पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) तपास सुरु केला.
तपासादरम्यान टीईटी परीक्षा पेपरमध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तेच धागेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे (Maharashtra State Examination Council) तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता.
पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारला त्यावेळी कोट्यावधी रुपयांची संपत्ती पोलिसांना सापडली.

 

 

Web Title :- TET Exam Scam | 2615-page indictment filed against 12 in TET 2018 exam malpractice case; 1701 Ineligible were made eligible

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Varsha Gaikwad On SSC Exam | ‘पेपरफुटीचं प्रकरण आढळल्यास थेट…’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय !

 

Hardik Pandya Yo-Yo Test | हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये खेळणार की नाही?; रिपोर्ट आला समोर

 

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांचे निरसन शास्त्रोक्त सादरीकरणाद्वारे – पुणे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे