TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) नवनवीन खुलासे होत आहेत. जीए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार (Ashwin Kumar Sivakumar) याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. शिक्षण विभागातील (TET Exam Scam)  तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याचे अश्विनकुमारने पोलिसांना सांगितल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी न्यायालयाला दिली.

 

शिक्षक पात्रता परीक्षा  (TET Exam Scam)  या 2018 मध्ये झालेल्या परीक्षेत 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढवण्यासाठी शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने 5 कोटी रुपये दिल्याचे जीए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार याने पोलिस तपासात सांगितले आहे. त्यामुळे हे 600 ते 700 विद्यार्थी कोणत्या एजंटच्या माध्यमातून संपर्कात आले, सावरीकरने गुण वाढवण्यासाठी किती जणांकडून पैसे घेतले, याबाबत सावरीकरकडे तपास करायचा असे, सहायक सरकारी वकील विजय सिंह जाधव यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अभिषेक सावरीकर याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.ए. शेख (First Class Magistrate M.A. Sheikh) यांनी हा आदेश दिला.

टीईटीच्या 2018 मध्ये झालेल्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सावरीकरला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासंदर्भात या परीक्षेच्या
आयोजनाचे कंत्राट घेतलेल्या जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख (Dr. Preetesh Deshmukh),
सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) आणि अभिषेक सावरीकर यांची डिसेंबर 2017 मध्ये दिल्ली येथे बैठक झाली होती.

 

दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर सावरीकरने इतर आरोपींच्या मदतीने टीईटी 2018 परीक्षेतील अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करण्याची योजना आखली.
सावरीकर याने गुण वाढवून देण्यासाठी किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले आहे, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे,
यासंदर्भात तपास करण्यासाठी सावरीकर याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील जाधव यांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे.

 

Web Title :- TET Exam Scam | abhishek savarikar paid rs 5 crore tet exam scam said ashwin kumar pune cyber police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

 

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद