TET Exam Scam Case | अटकेत असलेल्या तुकाराम सुपेसह 5 आरोपींना कोरोना; पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकार्‍यांना देखील कोरोनाचा संसर्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam Case | पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांसह राज्यात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण अधिक वाढत आहे. राजकीय क्षेत्रात, सिनेक्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातच आता टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी (TET Exam Scam Case) अटकेत असलेल्या तुकाराम सुपे (Tukaram Supe), शिवकुमार (shivkumar), आश्विनकुमार (Ashvinikumar), आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma), निशीद गायकवाड (Nishid Gaikwad), राहुल लिंघोट (Rahul Linghot) यांना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर सायबरच्या पोलीस (Pune Cyber Police) उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांना देखील कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
अशातच आता आरोपींना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.
त्यातच त्यांच्या संपर्कात येणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
त्यामुळे सायबर पोलिसांची चिंता वाढली आहे.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांच्यासह 11 अधिकारी तसेच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत.

दरम्यान, सायबर पोलिसांकडून न्यायालयाला एक विनंती करण्यात आली आहे की, ‘आरोपींच्या संपर्कात राहून तपास करणे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट यांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून तूर्तास तरी त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial custody) मंजूर व्हावा,’ असं सांगण्यात आलं आहे.

Web Title :-  TET Exam Scam Case | tet exam scam tukaram supe including 5 accused infected corona eleven pune cyber police officers were corona positive including dcp bhagyashree navtake

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

 

Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल