TET Exam Scam | पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी तब्बल 3995 पानांचे दोषारोप पत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam | पुण्यातल्या टीईटी परीक्षा (TET Exam Scam) 2019-20 प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) दोषारोप पत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. 3955 पानांच हे दोषारोप पत्र पुणे न्यायालयात (Pune Court) दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तुकाराम सुपे (Tukaram Supe), सुखदेव ढेरेसह (Sukhdev Dhere) 15 आरोपी अटकेत (Arrest) आहेत. मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणात अजून 12 आरोपी फरार आहेत.

 

टीईटी प्रकरणात (TET Exam Scam) अनेक खुलासे होत होते, अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आत्तापर्यंत जे पंधरा आरोपी यामध्ये निष्पन्न झाले त्यामध्ये तुकाराम सुपे याच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर आज पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात नक्की काय घडलं ? यामध्ये कशा पद्धतीने कट रचला गेला. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास 12 लोकांचा यामध्ये शोध सुरु आहे.

काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य भरतीच्या परीक्षेत (Health Recruitment Exam) पेपर फुटीचे प्रकरण उजेडात आले.
या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करुन पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) तपास सुरु केला.
तपासादरम्यान टीईटी परीक्षा पेपरमध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तेच धागेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे (Maharashtra State Examination Council) तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता.
पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारला त्यावेळी कोट्यावधी रुपयांची संपत्ती पोलिसांना सापडली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- TET Exam Scam | chargesheet filed in tet exam scam on tukaram supe Sukhdev dhere and 15 others pune court 3995 pages

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा