TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam | राज्यात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात दररोज नवनवीन माहीती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) आजपर्यंत केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 2019-20 परीक्षेच्या निकालात तब्बल 7880 अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र केल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Examination Council) 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7880 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber police) केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तुकाराम सुपे (Tukaram Supe), अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) व प्रितीश देशमुख (Pritish Deshmukh) यांनी संगनमत करुन इतर आरोपींच्या मदतीने परीक्षेमधील निकालात अपात्र परीक्षार्थींचे मार्क वाढवून त्यांना पात्र करुन प्रमाणपत्र (Certificate) दिले. (TET Exam Scam)

 

या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल यांची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 705 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 880 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी ओएमआर शिट्स (OMR Sheets) चा तपास केला असता 7880 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे समोर आले. या प्रकरणातील अपात्र परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule),
पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Police Inspector D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (Police Inspector Kumar Ghadge),
पोलीस अंमलदार सचिन वाझे (Sachin Vaze), रविंद्र साळवी, तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक कोळी व खेडेकर यांनी या तपासात मदत केली.

 

 

Web Title :- TET Exam Scam | Exciting! 7880 bogus teachers in the state, 7880 ineligible candidates qualified by increasing marks; Sensational revelation in Pune police investigation (video)

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

 

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’

 

Reservation In Promotion | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! सरकारी नोकऱ्यांमध्ये SC आणि ST ना पदोन्नतीत आरक्षण