पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam) पुणे पोलिसांनी जीए सॉफ्टवेअरच्या (GA Software) अश्विन कुमार (Ashwin Kumar) आणि डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख (Dr. Pritish Diliprao Deshmukh) यांना अटक केली आहे. आता याप्रकरणात जीए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन (Founder Ganesan) याचाही सहभाग असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गणेशन याला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली असून अद्याप तो हजर झालेला नाही.
टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) अश्विन कुमार, सौरभ महेश त्रिपाठी आणि निखिल वसंत कदम (वय-36 रा. काळेवाडी, पिंपरी, मुळ रा.मोरगाव ता. बारामती) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior Police Inspector Ajay Waghmare) यांनी आज (रविवार) न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी सांगितले की, जीए सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक गणेशन (रा. बंगलुरु) याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच सुखदेव ढेरे (Sukhdev Dhere) याच्या घराची झडती घेतली असता 2 लाख 90 हजार 380 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निखिल कदम (Nikhil Kadam) याच्याकडे असलेल्या मोबाईलमधून अश्विन कुमार याला पाठवलेले ई-मेल मिळाले आहेत. कदम याने अश्विन कुमार याला 56 परीक्षार्थींची यादी दिली होती. या परीक्षार्थींकडून प्रत्येकी 40 हजार रुपये घेतल्याचे ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
जीए सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा कर्मचारी शेखर मस्तुद (Shekhar Mastud) याच्या मदतीने
अश्विन कुमार याने 700 परीक्षार्थींचे गुण बदलून ती माहिती टीईटी 2018 या मेन सर्व्हरवर अपलोड करुन घेतले.
या 700 परीक्षार्थींची रोल नंबर आणि गुण असलेली यादी पेनड्राईव्ह मधून अश्विनकुमार याला दिली
असून हा पेन ड्राईव्ह जप्त करायचा. न्यायालयाने अश्विनकुमार व सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi)
यांची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी केली असून निखिल कदम
याला 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title :- TET Exam Scam | GA software founder ganeshan involved tet paper leak case pune police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान
WhatsApp Alert | 2022 मध्ये ‘या’ स्मार्टफोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअप, तुमच्याकडे आहे का हा फोन
Pune Crime | फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा
Omicron Covid Variant | चिंताजनक राज्यात आज ओमिक्रॉनचे नवे 50 रूग्ण, पुण्यात सर्वाधिक 36