TET Exam Scam | टीईटी गैरव्यवहारातील आरोपी IAS सुशील खोडवेकर याचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात (TET Exam Scam) जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस (G. A. Software Technologies) कंपनीला काळ्या यादीतून (Blacklist) बाहेर काढण्यास मदत आणि या प्रकरणात (TET Exam Scam) आर्थिक लाभ स्विकारल्या प्रकरणी शिक्षण विभागाचा तत्कालीन उपसचिव (Deputy Secretary of the Department of Education) सुशील खोडवेकर Sushil Khodvekar (वय-47) याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक (Arrest) केली आहे. सुशील खोडवेकर याने न्यायालयात सादर केलेला जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस जे. डोलारे (First Class Magistrate S.J. Dollars) यांनी फेटाळून (Bail Application Rejected) लावला.

 

सुशील खोडवेकर याला सायबर पोलिसांनी ठाणे (Thane) येथून 29 जानेवारी रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे.  तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्यावरील चौकशीची तीव्रता कमी करण्याच्या बदल्यात खोडवेकर याने सुपे याच्याकडून जी ए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास सांगितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (Police Inspector Kumar Ghadge) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

सुशील खोडवेकर याने न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) यांनी विरोध केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, हा गंभीर गुन्हा आहे. शिक्षणाच्या मंदिरात नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते. ते ठिकाण आरोपींनी प्रदूषित केले आहे. अत्यंत शांत डोक्याने आरोपी अश्विनकुमार (Ashwinkumar), डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. Pritish Deshmukh), तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांनी संगनमत करुन हा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपी खोडवेकर हा आरोपींच्या सतत संपर्कात असल्याचे फोन कॉलवरुन निष्पन्न झाले आहे. आरोपींनी परीक्षार्थी यांच्याकडून प्रत्येकी 3 ते 4 लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवून करोडो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. (TET Exam Scam)

 

 

तुकाराम सुपे याच्या विरोधातील विभागीय चौकशी (Departmental Inquiry) खोडवेकर याच्याकडे होती.
ही चौकशी शिथिल करुन त्याबदल्यात जी ए सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी खोडवेकर याने सुपेवर दबाव टाकला होता.
यामुळे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatraya Jagtap) व इतरांचा विरोध असतानाही
सुपे याने स्वत:च्या अधिकाराचा वापर करुन कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढले.
खोडवेकर हा उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्याला जर जामीन दिला
तर तो आपल्या अधिकाराचा वापर करुन पुराव्यात फेरफार करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने खोडवेकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

Web Title :- TET Exam Scam | IPS Sushil Khodvekar bail denied in TET malpractice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा