TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam | मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (TET Exam Scam) रोज समोर येणार्‍या नवीन माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 7 हजार 800 उमेदवारांकडून पैसे घेऊन पास केलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासामध्ये ही बाब समोर आली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात हा गैरव्यवहार (TET Exam Scam) झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत घोटाळेबाजांनी उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं उघडकीस आलं आहे.

दरम्यान, 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचं समोर आलं. असं असतानाही या सर्वांना पात्र ठरवण्यात आलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासानंतर ही बाब लक्षात येताच शिक्षण विभागात (Department of Education) मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | API Sanjeev Honaji Nimbalkar and
Mohammad Ali Wali Mansuri arrested while taking bribe Dongri Police Station Mataka Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या