TET Exam Scam | IAS सुशील खोडवेकरची करामत ! सावरीकरकडून घेतले पैसे, सुपेनी केले उमेदवार पास; आयएएस अधिकार्‍याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात (TET Exam Scam) जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस (G.A. Software Technologies) कंपनीला काळ्या यादीतून (Blacklist) बाहेर काढण्यास मदत आणि या प्रकरणात (TET Exam Scam) आर्थिक लाभ स्विकारल्या प्रकरणी शिक्षण विभागाच्या तत्कालीन उपसचिव (Deputy Secretary of the Department of Education) आयएएस सुशील खोडवेकरला (IAS Sushil Khodwekar) अटक (Arrest) केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) ठाण्यातून (Thane) या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणात शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Education Council Commissioner Tukaram Supe), शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर (Education Department Advisor Abhishek Savarikar) यांना यापूर्वीच अटक केली आहे. आता थेट IAS अधिकाऱ्याला अटक केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

सुशील खोडवेकर Sushil Khodvekar (वय-47) असे अटक करण्यात आलेल्या आएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. खोडवेकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असताना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी खोडवेकर हे शिक्षण खात्यातील आस्थापना विभागात उपसचिव होते. सध्या त्यांची नियुक्ती कृषी खात्यात (Agriculture Department) आहे.

सुशील खोडवेकर याला आज (शनिवार) सकाळी अटक करुन दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात (TET Exam Scam) सुपे, सावरीकर, जी.ए सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालत प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh), माजी संचालक अश्विनकुमार (Ashwin Kumar) तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यांच्यासह इतर शासकीय नोकरदार आणि एजंट यांना अटक करण्यात आली आहे. (TET Exam Scam)

 

सुपेला सांगून मुले पास केली
खोडवेकर यांच्याकडे केलेल्या चौकशीत या गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. तपासात ही माहिती समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत केली. सावरीकर याच्याकडून पैसे घेतले. तसेच अनेक मुलांना पास केल्याचे तपासात समोर आले आहे. खोडवेकर याने आयुक्त तुकाराम सुपे याला सांगून ही मुले पास केली. सुशील खोडवेकर याने सावरीकरकडून पैसे घेऊन सुपेला सांगून मुलांना पास केले. यासह खात्यांतर्गत चौकशीत सुपेला बेकसूर ठरवण्यात खोडवेकर याची महत्त्वाची भूमिका होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- TET Exam Scam | tet exam scam IAS officer sushil khodwekar remanded in police custody till january 31

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोन्याचे दर 1000 रूपयांनी तर चांदी 2500 ने घसरली, जाणून घ्या आजचे दर

 

Crime News | तिथं जाण्यासाठी खर्च केले 75 लाख ! एकाच कुटुंबातील 4 मृतदेह संशयास्पद सापडले; सर्वत्र खळबळ

 

ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिला स्पष्ट शब्दात ‘हा’ इशारा