TET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची कारवाई, OMR शीटची पडताळणी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गाजलेल्या आरोग्य भरती, लष्कर भरती (Army Recruitment) आणि त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण (TET Exam Scam) चांगलेच गाजले. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेत देखील गैरप्रकार (TET Exam Scam) झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणाचा तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून आता ओएमआर शीटची (OMR Sheet) कसून तपासणी करण्यात येत आहे.

 

नुकतेच पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी (TET Exam Scam) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त (Maharashtra State Examination Council Commissioner) तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे (former Commissioner Sukhdev Dere), शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Technical Advisor of Education Department Abhishek Savarikar), जीए टेक्नॉलजीचा (GA Software) आश्विन कुमार (Ashwin Kumar), सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripath), डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) यांच्यासह इतर दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई अंतर्गत आता पुणे पोलिसांनी पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (TET Exam Scam)

12 अधिकाऱ्यांच्या मदतीने OMR शीटची तपासणी
टीईटी घोटाळासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं ही तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणीमधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य भरतीच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण उजेडात आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुणे सायबर पोलिसांनी तपास सुरु केला.
तपासादरम्यान टीईटी परीक्षा पेपरमध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तेच धागेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता.
पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारला त्यावेळी कोट्यावधी रुपयांची संपत्ती पोलिसांना सापडली.

 

Web Title :- TET Exam Scam | tet fraud latest update today pune cyber police started investigation omr sheet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा