TET Exam Scam | टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – TET Exam Scam | सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी (TET Exam Scam) सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली.

या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे (education commissioner pune) ; शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे (director of primary education pune); शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे; संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

उपरोक्त समिती सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने (ga software technologies pvt ltd)
केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी (TET Exam Scam ) करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना (Maharashtra Education Minister) सादर करेल.
याबाबतचा शासन निर्णय (Maharashtra Government Order) आज जारी करण्यात आला आहे.

 

Web Title :- TET Exam Scam | The Thackeray government took a big decision in the case of irregularities in the TET exam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fastag Monthly Pass | रिचार्जच्या त्रासापासून होईल सुटका, ‘या’ सोप्या पद्धतीने ताबडतोब बनवा FASTag चा मंथली पास

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून छत्रपती संभाजी महारांच्या स्मारकाविषयी महत्वाचा निर्णय

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे