‘या’ फेमस हॉलिवूड फिल्ममेकरची 23 वर्षीय मुलगी बनली ‘पॉर्न’ स्टार, ‘अशी’ होती आई-वडिलांची ‘रिअ‍ॅक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेककर स्टीवन स्पीलबर्गची 23 वर्षीय मुलगी मिकाला स्पीलबर्गनं नुकत्याच आपल्या एका मोठ्या निर्णयानं सर्वांना धक्का दिला आहे. स्टीवनची मुलगी मिकालानं पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. मिकाला आता पॉर्न स्टार बनली आहे. मिकालाच्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांची रिअ‍ॅक्शन कशी होती हे मिकालानं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8xKPVrHM8M/

एका रिपोर्टनुसार, मिकालानं आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, इंडस्ट्रीत जाण्याआधीच तिनं सोलो पॉर्न व्हिडीओ बनवायला सुरुवात केली होती. मिकालानं जेव्हा पॉर्न इंडस्ट्रीत जाण्याबद्दल आपल्या पालकांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिला सपोर्ट केला. याशिवाय तिनं सोशल मीडियावरून देखील आपल्या जवळच्यांना आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. तिनं सांगितलं होतं की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तिला तिच्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे.

असं म्हटलं जातं की, मिकाला हिला स्टीवन स्पीलबर्ग आणि त्याची पत्नी अ‍ॅक्ट्रेस केट कॅपशॉ यांनी दत्तक घेतलं होतं. मिकाला अमेरिकेच्या टेनेसीमध्ये नॅशविलमध्ये रहाते. मिकाला सांगते की, माझ्या पालकांना माझ्या सुरक्षेची काळजी होती. ते चकित झाले परंतु ते माझ्यावर अजिबात नाराज नव्हते.

स्टीवन स्पीलबर्ग अमेरिकन फिल्म निर्माता, डायरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर आहे. त्यांनी ज्युरासिक पार्क, इंडियाना जोंस, लिंकन, सॉ, शिंडलर्स लिस्ट, सेविंग प्रायवेट रायन यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. एका रिपोर्टनुसार स्पिलबर्गची एकूण संपत्ती 3.1 मिलियन डॉलर एवढी आहे.

https://www.instagram.com/p/B8w4oP7gsGd/

https://www.instagram.com/p/B8R0BTogNK0/