मेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू, अमेरिकेच्या 8 शहरांमध्ये देण्यात आला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत मेंदू खाणारे अमीबा आढळण्याची घटना घडल्यानंतर आठ शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, घरात पुरवल्या गेलेल्या पाण्यात मेंदू खाणारे अमीबा असल्याचे आढळले होते. टेक्सॉसच्या लेक जॅक्सन शहरातही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. Naegleria fowleri नावाचा हा अमीबा नाकातून शरीरात शिरला तर प्राणघातक ठरू शकतो. या अमीबामुळे 90 ते 95 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी, अमेरिकेच्या टेक्सॉसमध्ये 8 सप्टेंबर रोजी अमीबाने मेंदू खाल्यामुळे 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तपासणी दरम्यान, मुलाला अमीबाची लागण झाल्याचे आढळले. स्थानिक अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, Naegleria fowleri नावाच्या अमीबामुळे मुलाचा मृत्यू तलावामध्ये खेळताना किंवा घरातल्या पाण्याच्या माध्यमातून मुलाच्या शरीरात शिरला.

ऑगस्टमध्येही फ्लोरिडामध्ये मेंदू खाल्ल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. आता टेक्सॉसमधील आठ शहरांतील लोकांना चेतावणी देण्यात आली. लोकांना घरात पुरवलेले पाणी वापरू नका असे सांगण्यात आले आहे. तथापि, नंतर पाणी साफ केल्यानंतर बहुतेक शहरांमध्ये हा इशारा मागे घेण्यात आला.

अमेरिकन सीडीसीच्या मते, चिखलाचे तलाव, नद्या, धबधबे आणि जलतरण तलाव देखील योग्यरित्या देखभाल न केल्याने यात मेंदू खाणारे अमीबा असू शकतात. तथापि, सीडीसीचे म्हणणे आहे की, Naegleria fowleri अमीबामुळे मृत्यूची प्रकरणे अपवाद आहेत. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत 2009 ते 2018 दरम्यान या अमीबाच्या संसर्गाची 34 प्रकरणे आढळली. तथापि, 1962 ते 2018 दरम्यान, 145 लोकांना संसर्ग झाला आणि केवळ 4 वाचले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like