Thackeray-Ambedkar Alliance | ठाकरे-आंबेडकर युतीसंदर्भात शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले-‘मी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray-Ambedkar Alliance | राज्यात शिवसेनेचा (Shivsena) वाद निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती (Thackeray-Ambedkar Alliance) होणार असल्याची चर्चा आहे. तसेच आज यासंदर्भात घोषणा होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) युतीचं ठरलं की घोषणा होईल. तसेच आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यसोबत बोलणी सुरु आहेत. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचे स्वागतच करू. माझा दोन्ही पक्षांना विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना विचारलं.
त्यावर उत्तर देताना सांगितलं की, ‘मला याबाबत काही माहिती नाही’.
मी या भानगडीत पडत नाही, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे की मनसे

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं.
ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्हाला मान्य नाही. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे,
असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे (MNS) याचा
खुलासा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करतील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Web Title :-Thackeray-Ambedkar Alliance | sharad pawar on uddhav thackeray and prakash ambedkar alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल