‘ठाकरे सरकार’कडून 10 रुपयात जेवणाच्या थाळीचा ‘प्रारंभ’ !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात 10 रुपयात जेवणाची थाळी सुरु करणार असल्याचे म्हंटले होते. या वचन पूर्तीचे पालन करत आज 19 डिसेंबर 2019 दुपारी 1.30 वाजता बृहमुंबई महानगरपालिकाकेच्या उपाहारगृहात याची सुरुवात करण्यात आली.

प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास 10 रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात. प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे 20 रुपयांच्या घरात जाते. परंतु ते 10 रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते.

शिवसेनेने आपल्या वचनम्यात 10 रुपयात जेवणाची थाळी देऊ असे सांगितले होते तर भाजपने 5 रुपयात जेवणाची थाळी देऊ असे सांगितले होते. मात्र आता शिवसेनेकडून १० रुपयात जेवण सुरु करण्यात आले होते यासंबंधी पार पडलेल्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखाताई राऊत, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची प्रमुख उपस्थिती होत आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/