मनसेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी ‘आघाडी’तील ‘एन्ट्री’मुळे शिवसेना-भाजप ‘युती’ धास्तावली ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पक्षांच्या जोरात हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील शिवसेना-भाजप युती विधानसभेला एकत्रितरित्या सामोरे जाऊ शकते. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा जोरात तयारी सुरु केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. अशी आघाडी झाली तर लोकसभेला मोदी सरकार विरोधात जबरदस्त प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंचा मनसे आघाडीसोबत जाणार का ? हा खरा प्रश्न आहे. राज ठाकरेंना आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता. पण नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचा विरोध मावळण्याची शक्यता आहे. लोकसभेत काँग्रेसचा झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला विधानसभेसाठी मनसेची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची आघाडी झाल्यास भाजप शिवसेनेचा विजयी रथ थांबविण्यास या आघाडीला यश मिळणार का? याचे उत्तर येणार काळच देईल.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना आघाडीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. शरद पवार यांच्यासोबत वाढत्या जवळीकीमुळे राज ठाकरे आघाडीत सामील होतील असे देखील वाटत होते. पण राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचाराने आघाडीला निवडणुकीत विजयाची आशा निर्माण केली. काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि संजय निरूपम यांच्यामुळे मनसेचा आघाडीत प्रवेश झाला नाही. मनसेला आघाडीत घेतल्यास उत्तर भारतीय मतदारांचा काँग्रेसला फटका बसेल असे मत काँग्रेसने मांडले. परंतु राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे हा विरोध मावळल्यात जमा आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीसोबत येऊ शकते.

काँग्रेसचे नुतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशा परिस्थिती काँग्रेसची नजर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीवर आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांचा दृष्टिकोन पाहता वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता फार कमी आहे.

मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास शहरी भागात आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण मनसेचा मतदार हा शहरी मतदार म्हणून ओळखला जातो. शहरात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी मनसे फॅक्टर चांगलाच यशस्वी ठरू शकतो. मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास शिवसेना भाजप युती समोर किती मोठे आव्हान असेल हे येणाऱ्या विधासभा निवडणुकीतच दिसून येईल.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

 

Loading...
You might also like