Thackeray Government | ठाकरे सरकारकडून ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे सहाय्य; ‘या’ पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांद्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्यू (Corona death) झालेल्या नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. त्यानुसार कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) देण्यात येणार आहे. याचा शासन निर्णय महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. (Thackeray Government)

 

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल (Submit online application) करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. (Thackeray Government) अर्जदारास, त्याचा आधार क्रमांक (Aadhaar number), मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate) आणि रुग्णालयाचा तपशील Hospital details (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे (Central Government) ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.

 

इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate)असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग,
न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात
आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

 

मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.
सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील,
जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार,
अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Thackeray Government | 50 thousand assistance from Thackeray government to the relatives of those who died due to corona; Find out how to apply online at home with minimal documentation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1040 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Variable Dearness Allowance | ‘या’ लाखो कामगारांच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात 4 टक्केपेक्षा जास्त वाढ, आता किती टक्के मिळेल जाणून घ्या

Rohit Sharma | रोहित शर्मा वनडे संघाचा नवा कर्णधार; टी-20 संघाचीही कमान सांभाळणार; विराट कोहलीला डच्चू