Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची भरपाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | कोरोनामुळे (Corona died) झालेल्या मृत्यूची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबीयांना 50,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. तर, ही भरपाई राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (Maharashtra State Disaster Response Fund) मधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने (Thackeray Government) घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोरोनाने निधन (Corona died) पावली आहे, तसेच जर त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे.

 

कोरोना मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत.
हे सहाय्य मिळण्यासाठी कोरोना आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेईवाईकाने राज्य शासनाने (Thackeray Government)
या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे.
तसेच, अर्जदार स्वत: अथवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकणार आहे.

 

दरम्यान, सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करावे.
याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक 202111261612210519 दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आला आहे.
तसेच, यात सविस्तर माहिती दिली आहे.
तसेच, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवडयातच विकसित केले जाणार आहे.
त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती याची माहिती देण्यात येणार आहे.

 

Web Title :- Thackeray Government | 50 thousand rs assistance to relatives of those who died due to covid a big announcement from the Maharashtra government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा