Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   Thackeray Government Big Decision | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील महिला पोलिसांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला (Thackeray Government Big Decision) आहे. आता महिला पोलिसांचे कामाचे तास 12 वरून कमी करून 8 तास करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली.

आता कुटुंब आणि नोकरी ताळमेळ शक्य – खा. सुळे

महिला पोलिसांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
यासंदर्भात खासदार सुळे यांनी ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांचे कामाचे तास 12 वरून कमी करून 8 करण्याचा
निर्णय घेतला आहे.
हा निर्णय अतिशय चांगला असून महिला पोलीस कर्मचार्‍यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये (Thackeray Government Big Decision)
उत्तम ताळमेळ साधणे शक्य होईल.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण
मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसातील महिलांसाठीही 8 तासांची ड्यूटी करण्यात आली होती.

 

Web Title : Thackeray Government Big Decision | maharashtra govt reduce working hours of women police from 12 to 8 hrs say dgp sanjay pandey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल

Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील पूर्ण 36000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?