Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींची तरतूद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Thackeray Government | राज्यातील शाळांची स्थिती (school) सुधारण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून लवकरच ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. राज्याच्या शालेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील शाळांची दुरावस्था सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या अभियानासंदर्भात माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे आणि ते पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वराज्य जननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ (rajmata jijau shaikshanik gunvatta vikas abhiyan) हा उपक्रम आम्ही सुरु करत आहोत, असे गायकवाड यांनी सांगितले.

सरकारकडून 200 कोटीची तरतूद

या अभियानांतर्गत मोडकळीस आलेल्या जुन्या शाळांची पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 718 शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी आणि 1050 शाळांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी अभियानासाठी सरकारकडून 200 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील शाळा झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये राज्यातील इतर विभागातही या उपक्रमाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. (provision of Rs. 200 crore for repair of schools in Marathwada)

 

10 टक्के खर्च शाळांना करावा लागेल

या अभियानातील 80 टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. तर उर्वरित 20 टक्क्यांपैकी 10 टक्के रक्कम जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि 10 टक्के रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे लोकवर्गीणीतून किंवा सीएसआर (CSR) फंडातून उभी केली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

 

Web Title : Thackeray Government | big decision state government provision rs 200 crore repair schools marathwada

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Navi Mumbai | धक्कादायक ! महिला पोलिसानं चक्क पोलिस नाईकाची ‘या’ पध्दतीनं केली ‘गेम’

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 31 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या, अनेक जिल्हयातील पोलिस अधीक्षकांच्या (SP) बदल्या

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू