Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यानंतर राज्यात ओबीसी समाज (OBC society) आक्रमक झाला आहे. असे असतानाच मंगळवारी (दि. 22) राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी राज्यातील 5 जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची (Zilla parishad by-elections) घोषणा केली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका थांबवाव्यात अशी भूमिका मंत्रिमंडळात मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (NCP leader and Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलीच खडाजंगी होण्याची चिन्ह आहे. Thackeray Government | chhagan bhujbal angry over zilla parishad by elections decision new controversy in thackeray government

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) राज्यात जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग आहे. तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्ह्यातील जि. प. निवडणुकांची घोषणा केली आहे. यापूर्वी फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका घ्या असे ओबीसी नेते म्हणत होते. पण देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने केंद्राकडे डेटा गोळा करण्याच्या मागण्या केल्या आहेत. पण केंद्राने याकडे दुर्लक्ष केले आहे.

त्यावेळी कोरोना नव्हता, मग फडणवीस सरकारने डेटा का गोळा केला नाही, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. हा कायदा देशाला लागू होईल. फडणवीसांना ही विनंती आहे की, याबद्दल केंद्राला सांगा डेटा द्या, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. मी मंडल आयोग अन् ओबीसी मुद्यावर शिवसेना (Shiv Sena) सोडली, त्यावेळी सेना सोडण शक्य होत का? शरद पवारानी (Sharad Pawar) त्यानंतर ओबीसी आरक्षण दिल. ते 27 वर्ष चालल, नंतर नागपूरच्या मंडळींनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेल ? का नेल नागपुरकरांनी? असे म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला आहे.

Web Title :- Thackeray Government | chhagan bhujbal angry over zilla parishad by elections decision new controversy in thackeray government

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी