‘ठाकरे सरकार’ मे-जून महिन्यात कोसळणार ? भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या पोट निवडणुकांमध्ये जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला

भाजपने निवडणुकीची तयारी केली आहे त्यामुळे येत्या मे – जून महिन्यात राज्यात असलेले ठाकरे सरकार कोसळेल आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि प्रवक्ते गिरीश व्यास यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जनतेच्या पाठीत कोणीही खंजीर खुपसू शकत नाही तसे करण्याचा प्रयत्न केल्यास जनता त्यांना शिक्षा करेल हा संदेश आता सगळ्यांना समजला असेल. जनतेने भाजपला नवीन ताकद दिली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया दिली होती.

कर्नाटकाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये ते म्हणतात, जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात आणि संधीसाधू राजकारण करतात. त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकवते याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकात झालेल्या निवडणूका होय असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

अजित पवार आणि देवेन्द्र फडणवीस यांच्यात झाली भेट
नुकतेच आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी मात्र काही नाही हवापाण्याबाबत चर्चा झाली असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमी येणार असल्याचे म्हंटले आहे. महाविकास आघाडीचा जन्म केवळ सत्तेसाठी झालेला आहे, या आघाडीचा जन्म महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करण्यासाठी झालेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही महिन्यात गोड बातमी येईल असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com