Thackeray Government | ठाकरे सरकारकडून कोविडने मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत ! ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक; जाणून घ्या नियम व अटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे (Coronavirs in Maharashtra) लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू (covid victims) झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे.

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ठाकरे सरकारने (Thackeray Government) त्या संदर्भात GR काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे (State Disaster Relief Fund) दिली जाणार आहे.

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झाली होती. न्यायालयाने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित (Developed computer systems) करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

कोणाला मिळणार आर्थिक मदत?

– राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून देण्यात येणार आहे.

 

– कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या (Suicide) केली असेल तरीही ही मदत देणार आहे.

 

– कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू झाला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल,
तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.

– जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे.
त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,
1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे From 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे,
अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.

 

– Medical Certificate of Cause of Death (MCCD) मध्ये ‘कोव्हिड-19 मुळे मृत्यू’
या प्रमाणे नोंद नसली तरी ही अटीची पूर्तता होत असल्यास त्या प्रकरणात मदत देण्यात येईल.

 

अर्ज दाखल करताना ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक

– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

– अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील

– मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील

– मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र

– इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र

 

Web Title :- Thackeray Government | coronavirs maharashtra news thackeray government fixes rs 50 000 for covid victims, know about rules and documents needed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Punit Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय !

Constitution Day | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ ऐतिहासिक वारसा मुरबाड भूमीत भारतीय संविधानाचा 72 वा वर्धापन दिन साजरा

Earwax Cleaning Tricks | कानातील मळ काढण्याची ‘ही’ पद्धत अतिशय धोकादायक, सावध व्हा ! अन्यथा फाटू शकतो कानाचा पडदा