Thackeray Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) घेण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Government Employees, Officers) वाहतूक भत्यात वाढ करण्याच्या वित्त विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून (Maharashtra Cabinet) काल (गुरुवारी) मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे 1 एप्रिलपासून आता राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रतिमहिना वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ होणार आहे.

 

प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात प्रति महिना 3 हजारांची, द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात प्रति महिना 2 हजारांची तर तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात प्रति महिना 1 हजारांची वाढ झाली आहे. अंध, अपंग व मूकबधीर कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात दुपटीने वाढ झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शासकीय वाहन नाही अशा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच हा भत्ता देण्यात येतो. (Thackeray Government)

 

दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 700 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
त्याचबरोबर या निर्णयाचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाकडून स्वागत करण्यात आले आहे. ग. दि. कुलथे (G. D. Kulthe) म्हणाले की, ”वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील आश्वासनानुसार हा निर्णय घेण्यात आला ही स्वागतार्ह बाब असल्याचे ते म्हणाले.”

 

Web Title :- Thackeray Government | increase in transport allowance for maharashtra government employees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा