Thackeray Government | लाखो विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी खुशखबर ! ठाकरे सरकार कोरोनाच्या काळात 188 अंतर्गत दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | कोरोना (Corona) काळात नियमांचं उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोना कालावधीमध्ये कलम 188 (Section 188) अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग (Maharashtra Home Department) मागे घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. या गुन्ह्यांमुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा विचार करता राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. (Thackeray Government)

 

कोविडच्या काळात ज्या नागरिंक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी अथवा कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल”. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. (Thackeray Government)

 

कोरोना कालावधीत ज्या मुलांवर आणि नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे गृह विभागाकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भातील अंमलबजावणीसाठी गृह खात्याने राज्यांतील 188 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Thackeray Government | Maharashtra home minister dilip walse patil announced crimes filed under 188 will be withdrawn by the home department

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा