Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government । काही दिवसापूर्वी काही प्रमाणात रुग्णाच्या संख्येत घट दिसून आल्याने ठाकरे सरकारने (Thackeray Government) काही वेळेनुसार निर्बंध शिथिल केलेत. तर काही जिल्ह्यात कोरोनाची (Corona virus) स्थिती कायम असल्यानं तेथील निर्बंध उठवले नाहीत. पुढील आठवड्यात राज्य पूर्ण अनलॉक (Maharashtra Unlock) होणार अशा चर्चा कालपासून सुरु होत्या. आजच्या बैठकीत सरकार निर्णय घेण्याची शक्यता होती. मात्र असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्यातील निर्बंध जसे आहे तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात येणार नाही, जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Health Minister Rajesh Tope) सांगितलं आहे.

आज (बुधवारी) राज्यातील निर्बधासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, राज्यातील निर्बंध जसे आहे तसेच कायम ठेवण्यात आले आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. मागील तीन आठवड्यात रुग्णसंख्या स्थिर आहे. मात्र, 10 जिल्ह्यात 92 टक्के रुग्ण आहे. म्हणून टप्पा 3 (Level 3) मध्ये अनेक जिल्हे येतात. म्हणून राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, ‘ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेत, त्यांनी दुकानं खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पुढे बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करताहेत. यावरून कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिलेत असंही राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले. या दरम्यान राज्य सरकारने सावध भूमिका घेत तूर्त तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार नसल्याचे स्पष्ट देखील केलं आहे.

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात (DA) मध्ये 11% वाढ

MPSC Recruitment | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC मार्फत 15 हजार 511 पदांसाठी लवकरच भरती होणार

Post Office च्या ‘या’ बँकेत असेल खाते तर 1 ऑगस्टपासून होत आहे मोठा बदल, खर्च करावे लागतील जास्त पैसे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Thackeray Government | maharashtra is not completely unlocked big decision of the state government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update