Thackeray Government | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये होणार मोठे बदल?, राजकीय हालचालींना वेग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) तिन्ही पक्षांमधील कुरबुरी कानावर आली आहे. ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) मंत्रिमंडळातील फेरबदल हे एप्रिल महिन्यातच होणार असल्याची माहिती समजत आहे.

 

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये (Thackeray Government) फेरबदल होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांची एक बैठक पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. गृहखात्याची (Home Department) अदला-बदल होणार असल्याची माहिती समजत आहे. मात्र गेल्या काही दिवसांमागे काही नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती.

 

मुख्यमंत्र्यांनी गृहखातं आपल्याकडे ठेवावं अशी मागणी, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली होती.
त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनीही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.
विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker Election) निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही आहेत मात्र अद्याप निवडणुक न झाल्याने त्यांची नाराजी सातत्याने दिसून आली आहे.

 

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र सरकारचा कारभार सुरुळीतपणे सुरु असल्याचा दावा करत,
हे सरकार पाच वर्षे टिकणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे आता खरंच राज्याच्या मंत्रिमंडळात काय बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Thackeray Government | mahavikas aghadi in action mode possibility of major reshuffle in state cabinet said sources thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | धक्कादायक ! युट्यूबवर व्हिडीओ पाहून 5 महिन्यांच्या 17 वर्षीय गर्भवती तरूणीनं केला गर्भपात

 

Tata Group Stock | टाटाच्या ‘या’ कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 18 लाख, जाणून घ्या

 

Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | काय सांगता ! होय, 78 वर्षाच्या महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, जाणून घ्या