Thackeray Government | सोमय्यांच्या आरोपानंतर आता ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Thackeray Government | महाविकास आघाडी सरकार आणि भाजप (MVA and BJP) यांच्यात सातत्याने वाद वाढताना दिसत आहे. नुकतंच भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज (सोमवारी) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांच्यावर 127 कोटी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. यावरुन राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. सोमय्यांनी 11 मंत्र्यांची कुंडली काढली होती. आता 12 वा मंत्री म्हणजे मुश्रीफ याच्यांवर त्यांनी आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यावर भाजपने वारंवार घोटाळ्याचे आरोप करण्याचा सुरसपाटा लावला आहे. या आरोपांनतर आता ठाकरे सरकारनेही (Thackeray Government) आरोपाच्या फैरी भाजपवर (BJP) उठवल्या आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांनी पलटवार करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
त्यावेळी मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार दाखल करणार आहे. भाजप सत्तेत असताना पाटील यांनी घोटाळे केले आहेत.
रस्ते घोटाळ्या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.
त्याबाबतचे पुरावे देणार आहे. चंद्रकांत पाटील यांच धाडस झालं नाही म्हणून त्यांनी किरीट सोमय्यांच्या खाद्यावर बंदूक ठेवली.
सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते.
तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती. असं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणा-या सोमय्यांनाच (Kirit Somaiya) मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
मी आतापर्यंत 50-50 कोटींचे अब्रुनुकसानीचे 6 दावे दाखल केले आहेत.
आता सातवा दावा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली.
गेल्या 17 वर्षांपासून मी राजकारणात आहेत. माझ्यावर कोणी आरोप केला नाही.
भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही.
येत्या 2 आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीची 100 कोटींचा दावा कोल्हापूरच्या
सत्र न्यायालयात करतोय.’ असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले होते सोमय्या?

हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत 2700 पानांचा पुरावा असल्याचा दावा किराट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुंबईत ED कडे मंगळवारी याविरोधात अधिकृत तक्रार करणार आहे. त्यानंतर दिल्लीला ED, अर्थ मंत्रालय, कंपनी मंत्रालयाकडे हे पुरावे देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Thackeray Government | ncp hasan mushrif slam bjp chandrakant patil and kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMSBY | वर्षाला द्यावा लागेल फक्त आणि फक्त 12 रुपयांचा प्रीमियम, गरजेला मिळतील 2 लाख रुपये; जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,233 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Saki Naka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले – मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे