ठाकरे सरकारचा आदेश ! ‘ती’ मालमत्ता किमान 15 वर्षे विकता येणार नाही; बंगला, फ्लॅट अन् रो-हाऊससाठी अट लागू

पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पादरम्यान महिलांना मुद्रांक शुल्कात (Stamp duty) एक टक्‍यांची सवलत जाहीर केली होती. यावरूनच १ एप्रिलपासून ही सवलत मिळणार आहे. मात्र महिलांना खरेदी केलेली मिळकत आगामी १५ वर्षे कोणालाही विकता येणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य शासनाने ही सवलत जाहीर केलेल्यामध्ये बंगला, फ्लॅट, रो बंगल्याच्या खरेदीसाठीच सवलत असणार आहे. तर शेती खरेदी करताना मात्र मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत असणार नाही. असे त्यात नमूद केले आहे. या दरम्यान, महिलांच्या नावावर अधिकाधिक मिळकती व्हाव्या, नव्या नियमाचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावे मालमत्ता होणार आहे. यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. तर, शहरी भागात मुद्रांक शुल्क ६ टक्के इतके असेल त्यात एका टक्का तसेच गामीण भागात ५ टक्के मुद्रांक शुल्क असेल. त्यात महिलांना १ टक्का सवलत मिळेल. १ लाखाला किमान १० हजारापर्यंत सवलत मिळणार आहे. सवलतीमुळे राज्य सरकारच्या महसूलात थोडीफार घट होणार असली तरी महिलांना तिच्या हक्काचे घर मिळावे यासाठी ही सवलत राबवली जात आहे.

तसेच, २०२०-२१ या आर्थिक वर्षात महिलांच्या नावावर नेमक्‍या किती मिळकती होतात याकडे लक्ष लागून आहे. या दरम्यान, खरेदी विक्रीच्या व्यवहारात पुरूष हे पुढाकार घ्याचे आणि पुरुषांच्याच नावे व्यवहार होत असे. फक्त सवलत घेऊन कोणीही मिळकतीचा व्यवहार करण्यास मोकळे होऊ नये, तसेच सवलतीचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी एकदा मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर आगामी १५ वर्षे ती विकता येणार नाही. तर या नियमाचा कोणी उलंघन केल्यास मुद्रांक शुल्कातील सवलत दंडासह वसूल केली जाणार आहे. तर या अटीमुळे कमीतकमी १५ वर्षे तरी संबंधित महिलेच्या नावे मिळकत राहण्यास मदत होईल. तसेच, समजा खरेदीदाराचा मृत्यू झाल्यास तिच्या वारसांना मुद्रांक शुल्कात ही सवलत मिळणार नसल्याचं सांगितलं आहे.