Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या साठ लाख महिलांना 1 रुपया नाममात्र दरात दरमहा 10 सॅनिटरी नॅपकिन (Sanitary Napkin) उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.

 

28 मे जागतिक मासिक पाळी दिनाचे (May 28 World Menstruation Day) औचित्य ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (शनिवार) ही घोषणा केली आहे.
”मासिक पाळीदरम्यान घेण्याची काळजी व सफाईतील कमतरतांमुळे जगभरातील 8 लाख महिलांचा मृत्यू झालाय.
स्त्रियांच्या मृत्यूतील हे सर्वात मोठे पाचवे कारण आहे.
भारतात 320 दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी फक्त 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात.
महाराष्ट्रात 66 टक्के स्त्रिया याचा वापर करतात. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे स्थान 13 वे आहे.
ग्रामीण भागामध्ये त्याच्या वापराचे प्रमाण 13.50 टक्के इतके असल्याचे,” मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. (Thackeray Government)

पुढे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, ”राज्यात आरोग्य विभागामार्फत (Department of Health) राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत 19 वर्षाखालील युवतींना 6 रुपयात 6 नॅपकिन असलेले किट पुरवण्यात येते. त्याचा लाभ दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना मिळत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना व बचत गटातील महिलांना 1 रुपया नाममात्र किमतीमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचं,” ते म्हणाले.

 

दरम्यान, ”साठ लाखापेक्षा अधिक लाभार्थी असल्याने वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर अनुषंगिक मशनरी (Ancillary missionary) बसवण्यात येणार आहे,
तसेच, यासाठी दोनशे कोटींचा खर्च येणार आहे.
याच्या प्रचाराचे कार्य आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत केले जाणार असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Thackeray Government | sanitary napkins will be made available to 60 lakh women below the poverty line at a nominal price of one rupee per month thackeray government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा