Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्यातील ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रा मेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क (Solar Energy Park) उभारण्यासाठीचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ (Maharashtra State Cabinet) बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. बरोबर संयुक्त कंपनी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करणार आहे. सध्या महाराष्ट्रात 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या समितीवर सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी देखील टाकली गेली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्प धारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क आदी केंद्र सरकारच्या (Central Government) मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. (Thackeray Government)

 

दरम्यान, 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रा मेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारणीसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company) 50:50 टक्के प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपारंपरिक ऊर्जा साठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित केले जाणार आहे. दरम्यान, यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

Web Title :- Thackeray Government | solar energy park to be set in maharashtra decision by uddhav thackeray cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Azaan On Loudspeaker | ‘महाविकास’चंही ठरलं ! अजानबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य

 

What Is The Right Time To Eat Fruits | फळ खाण्याची योग्य वेळ कोणती ?

 

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’