Thackeray Government | ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! 1 मे पासून अतिरिक्त ऊस गाळप अनुदान निश्चित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून अतिरिक्त ऊस गाळप होणाऱ्या ऊसासाठी अनुदान देण्यात येणार आहे. 200 रुपये प्रति टन उसाला अनुदान देण्यात येईल, तसेच 5 रुपये प्रति टन वाहतुकीला देण्यात येणार आहे. अतिरिक्त ऊस गाळप अनुदान (Additional Cane Threshing Grants) निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन जादा झाले असून अनेक शेतकऱ्यांवर ऊस गाळप शुल्काचा भार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे पासून अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 मे 2022 पासून गाळप होणाऱ्या आणि साखर उताऱ्यामध्ये 10 टक्केपेक्षा 0.5 टक्के घट कमी आल्यास आणि अंतिम साखर उतारा 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी होणारे कारखाने घट उतारा अनुदानास पात्र राहतील, असं देखील यावेळी सांगण्यात आलंय. (Thackeray Government)

 

दरम्यान, महाराष्ट्रातील 103 कारखान्यांपैकी शासनाच्या अटी पात्र करणारे कारखाने 51 आहेत. या कारखान्याचे हंगामात अखेर एकूण संभाव्य गाळप 17.5 लाख टन होईल. या पात्र कारखान्यांना प्रतिटन 200 प्रमाणे जादा ऊस गाळप अनुदान देण्यात येईल. 50 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या ऊसासाठी 5 रुपये प्रति टन प्रमाणे वाहतूक अनुदान देण्यात येईल. असं सांगितलं आहे.

 

Web Title :- Thackeray Government | thackeray government grants to sugarcane for from month of may 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा