Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! ‘या’ कर्मचार्‍यांना मिळणार दिवाळी भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Thackeray Government | दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदरच ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) काही कर्मचार्‍यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शुक्रवारी घोषणा केली की ते बीएमसी आणि बेस्ट (BMC and BEST) कर्मचार्‍यांना आतापर्यंचा सर्वात जास्त दिवाळी बोनस (Diwali bonus) देणार आहेत, ज्यामुळे त्यांच्यासाठी सण आणखी आनंदाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

सीएम ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासोबत उपस्थितीत लोकांमध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar), उप महापौर सुहास वाडकर (Deputy Mayor Suhas Wadkar), स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav), बेस्ट कमिटीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर (BEST Committee Chairman Ashish Chemburkar), बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र (BEST General Manager Lokesh Chandra), संयुक्त आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिंद सावंत (Joint Commissioner (General Administration) Milind Sawant), बृहन्मुंबई महानगर पालिकेसह बेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी संघाच्या नेत्यांचा समावेश (Thackeray Government) होता.

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे (BMC) अधिकारी आणि बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन (BEST) च्या अधिकार्‍यांना 20,000 रुपयांचा बोनस मिळेल. लाईवमिंटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना बोनस म्हणून 10,000 रुपये मिळतील, तर आरोग्य कर्मचार्‍यांना 5,300 रुपये मिळतील.

 

मागील वर्षी बीएमसीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना 15,500 रुपयांचा बोनस दिला होता.
याशिवाय बीएमसी शालेय शिक्षक आणि कर्मचार्‍यांना 7750 रुपयांचा बोनस दिला.
तर बीएमसी शाळांमधील कंत्राटी शिक्षकांना 4700 रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली. (Thackeray Government)

 

Web Title :- Thackeray Government | uddhav thackeray government announced diwali bonanza for bmc and best employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट ! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप (व्हिडिओ)

Heart Attack | नियमित जिम जाणार्‍यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का?, जाणून घ्या देशातील प्रमुख कार्डियक सर्जन काय म्हणतात

Side Effects of Reheating Foods | ‘हे’ 9 फूड्स दुसर्‍यांदा गरम करून खाल्ले तर आरोग्याचे होईल मोठे नुकसान