ठाकरे सरकारचा नवा आदेश ! कडक निर्बंधामध्ये आणखी ‘या’ 2 कामांचा अत्यावश्यक सेवेत केला समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे राज्य शासनाने काल बुधवारी रात्रीपासून १५ दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. याबाबत सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सूचनांनुसार या संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आलीय. यामध्ये आता अत्यावश्यक सेवेत आणखी २ विभाग समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये वनविभागातील विविध कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत दिली गेली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या दोन विभागांना मुभा दिली आहे. तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह विभागाशी निगडित अन्य व्यवसाय यांना सवलत देण्यात आली आहे. तसेच यामध्ये असणारा दुसरा विभाग म्हणजे विमान सेवेच्या अंतर्गत येणारे विमानतळ देखभाल, कुरियर, केटरिंग, सुरक्षा या सुविधा देणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यावश्यक सेवेखाली प्रवास करण्यास मुभा देण्यात येणार आहे असे शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने या अगोदर या २ विभागांना अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे सरकारच्या वतीने आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. या दरम्यान, जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. नाहीतर त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देखील मुख्यमंनत्री ठाकरे यांनी यापूर्वी दिल्या आहेत.