मित्रपक्षांच्या ‘या’ नेत्यांना ‘मंत्रिपद’ देण्याबाबत CM ठाकरे – शरद पवार ‘सकारात्मक’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात महाविकासआघडीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर शक्यता वाढल्या आहे की आता या आघाडीतील घटक पक्षांना मंत्रिपद मिळणार. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असल्याचे कळते आहे.

महाविकासआघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेकाप असे पक्ष आहेत. त्यामुळे हे संभव आहे की त्या पक्षांच्या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकते. लोकसभेत देखील हे मित्र पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी उभे होते.

लोकसभेत मोठे यश मिळल्यानंतर हे स्पष्ट होत होते की राज्यातील सत्ता देखील भाजप कायम राखणार, मत चाचणीत देखील तसेच दाखवले जात होते. अशी स्थिती होती की आघाडीला पुन्हा विरोधी पक्षांच्या बाकांवर बसावे लागणार. मात्र निकालानंतर गणित फिरली आणि शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठिंबा देणार अशी चिन्ह दिसायला लागली.

पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी दोन्ही निवडणूकीत आघाडीला विनाअट, शर्त पाठिंबा दर्शविला. परंतू भाजपने मात्र निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. असे असले तरी बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाने देखील विधानसभेपासूनच आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर यश मिळाले. अडचणीच्या काळात देखील या पक्षांनी आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्याचे फळ म्हणून आता बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी, अबू आझमी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/