नाणार प्रकल्पावरुन शिवसेना भाजपात तणाव, उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांना भेट नाकारली

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-

रत्नागिरीमध्ये होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपात तणाव वाढला आहे. शिवसेनेला या प्रकल्पाच्या कराराबाबत कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. त्यामुळे सेना चांगलीच आक्रमक झाल्याची बघायला मिळत आहे. यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे.

सुरुवातीपासूनच शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असे प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर म्हटलं होते. मात्र करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रधान यांची भेट नाकारली आहे.
[amazon_link asins=’B015QWEHLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8632e959-7a17-11e8-8bf6-3b29799c0b99′]

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठीची उद्यासाठीची वेळ मागितली होती.

या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी साैदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमीरात  (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.

महत्वाच्या बातम्या-
नाणार प्रकल्पावरुन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप मध्ये मतभेद