‘ठाकरे’ सरकारमधील जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ 7 मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचं ‘पालकत्व’ नाही मिळालं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. नुकतीच त्यांची यादीही समोर आली. ठाकरे सरकारमधील 43 पैकी 7 मंत्री असे आहेत ज्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे हे मंत्री आता राज्याचे मंत्री म्हणूनच त्या जिल्ह्याचा कार्यभार पाहणार आहेत.

ठाकरे सरकारच्या पालकमंत्र्यांच्या यादीत 17 मंत्री तर असे आहेत ज्यांना त्यांच्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. यात बीड, चंद्रपूर, जालना, नागपूर, नंदुरबार, पुणे, सांगली, ठाणे, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, जळगाव लातूर, नांदेड, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरीत 19 जिल्हे असे आहेत ज्यांना बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. ज्या 7 मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळाले नाही त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेनेच्या 1 नेत्यांचा समावेश आहे. जितेंद्र आव्हाड हेदेखील पालकमंत्रिपदापासून वंचित आहेत.

कोणताही जिल्हा न मिळालेले 7 मंत्री पुढीलप्रमाणे-

1) जितेंद्र आव्हाड(राष्ट्रवादी)
2) दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
3) प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
4) संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
5) विश्वजित कदम (काँग्रेस)
6) संदीपान भुमरे (शिवसेना)
7) राजेंद्र पाटील (अपक्ष)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/