‘त्या’ ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, आमचा लहान-मोठा पैलवानच तुम्हाला चीतपीट करेल : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जे कधीही मैदानात उतरले नाहीत, त्या ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या शरद पवारांच्या उमेदवारी माघे घेण्याच्या संदर्भातिल टीकेला प्रत्युत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर येथ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राजकारण करत असताना विधानसभा आणि लोकसभा मिळून मी आत्तापर्यंत १४ वेळा निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी, एकही निवडणूक पराभूत झालो नाही, एकदाही पडलो नाही.

नवी पिढी आणली पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे. या उद्देशाने मी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. तर, हे मला सांगतायेत की, पवारांनी मैदान सोडले. माझं त्यांना आव्हान आहे. उद्धव ठाकरे तुम्ही एकदा तरी मैदानात या. असे शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, लहानपणी कुस्ती खेळताना आम्हाला जिंकल्यानंतर रेवडी मिळायची. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला मैदानाची सवय आहे. आयुष्यात ज्यांनी मैदान बघितले नाही, त्यांनी आम्हाला सांगाव की मैदानात या. मी तर जाऊ द्या आमच्या तालमितला एखादा लहान-मोठा पैलवानच तुम्हाला चीतपीट करेल. असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

You might also like