चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘ठाकरे स्वतःच्या सोयीने हिंदुत्व वापरतात’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM,Uddhav Thackeray) यांनी सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाची( hindutva) व्याख्याच बदलली आहे. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, कारण तुमच हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे यांच्या भाषणावर दिली.

पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे हे बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करायचे विसरले आहेत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केल होते. हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है, हे मुळात तुमच्यासाठीच होत. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरु आहे. कोरोनाबाबत भाषणात चिडीचूप बसलात, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर का बोलला नाहीत, असे ते म्हणाले.

राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नव्हती, ती हत्याच होती आणि या प्रकरणी पुत्र आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे हे दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपविरुद्ध बोलले. यापुढे ते तसे बोलले तर मातोश्रीवरील आतलेबाहेरचे सगळेच बाहेर काढू, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

राणे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहेच. आज जे मी बोलतोय ते सीबीआय पाहतच असेल त्यांनी बोलावले तर मी, माझी मुले त्या बाबतची माहिती देऊ. स्वत:च्या मुलाला क्लीन चिट देण्याचा ठाकरेंना काय अधिकार. पोलिसांचा वापर करून ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. 39 वर्षे मी शिवसेनेत होतो. मला खूप काही माहिती आहे. उद्या बोललो तर तुमची पळता भुई थोडी होईल. भाषणात बेडूक वगैरे बोललात, बेडूक तरी एका दिशेने जाते. तुम्ही हिंदुत्वाला मूठमाती देत सेक्युलर होणारे आणि पुन्हा हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगणारे दोन तोंडी गांडूळ आहात, असा हल्लाबोलही राणे यांनी केला. उद्धव हे मराठा समाजाचा द्वेष करणारे आहेत, ते या समाजाला कधीही आरक्षण देणार नाहीत, असेही ते म्हणाले.पुढची 25वर्षे शिवसेना सत्तेत राहील असे म्हणतांना राऊत कोणत्या धुंदीत होते, असा सवाल राणे यांनी केला.

You might also like