दादरमध्ये ‘या’ बहुचर्चित चित्रपटाची पायरेटेड सीडी आढळल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाची पायरेटेड सीडी दुसऱ्याच दिवशी दादरच्या फुटपाथवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी बहुचर्चित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. राज्यातील अनेक शहरांमध्ये शिवसैनिकांनी त्याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. अनेक नेत्यांनी संपूर्ण शो विकत घेऊन नागरिकांना मोफत चित्रपट दाखविला. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी दादर येथे या चित्रपटाची पायरेटेड सीडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
‘मनकर्णिका’ने मारली बाजी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’आणि झाशीची राणी हिच्या जीवनावरील ‘मनकर्णिका’ या दोन चित्रपटांच्या लढती बॉक्स आफिसवर ‘मनकर्णिका’ भारी पडली आहे. ‘मनकर्णिका’ ने पहिल्याच दिवशी तब्बल ९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी हिंदी भाषेतील ‘ठाकरे’ ने पावणेतीन कोटी आणि मराठीतील ‘ठाकरे’ ने २ कोटी रुपयांचा व्यवसाय पहिल्या दिवशी केला आहे.  बॉक्स आफिस इंडिया च्या रिर्पोटनुसार मनकर्णिकाने तब्बल ९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.