पुर्वी ‘आर्मी नर्स’ असलेल्या राणीनं थायलंडच्या राजाशी केली ‘बेवफाई’, तिनं ‘शाही’ पद गमावलं

बँकॉक : वृत्तसंस्था – थायलंडचा राजा महा वजीरालॉन्गकॉर्नने आपली चवथी पत्नी सिनीनात (वय -34) हिला राजघराण्याच्या सर्व पदांवरून पदच्युत केले असून तिला राजघराण्याकडून मिळणाऱ्या सर्व सोई देखील रद्द केल्या आहेत. धोका आणि राणीची बरोबरी करण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे तिच्याकडून शाही पदवी देखील काढून घेण्यात आली आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वीच तिला ही शाही पदवी देण्यात आली होती.

थायलंडची राणी सिनीनात वॉन्गवजीरापकडी ही ‘कोई’ या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. 67 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजाने तिला शाही पदवी दिली होती. थाई राजशाहीमध्ये जवळजवळ एका शतकाभर कोणालाही पदवी दिली नव्हती. राजाने आर्मी नर्स असलेल्या सिनीनातला “Chao Khun Phra” चा शाही दर्जा दिला होता.

थायलंडचा 66 वर्षीय राजा महा वजीरालॉन्गकॉर्न याने मे महिन्यात राजाने आपल्या अंगरक्षक सिनीनातशी लग्न करून सर्वांना चकित केले. हे त्याचे चौथे लग्न होते. सिनीनात या लष्करी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. राजघराण्याच्या बॉडीगार्ड म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

Visit : Policenama.com