काय सांगता ! होय, एक-दोन नव्हे तर तब्बल 58 तास Kiss करत या जोडप्यानं केलं अनोखं रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    किस (Kiss) करून रेकॉर्ड ( Record) करून या कपलने लाखो रुपये आणि हिऱ्याची अंगठी जिंकली आहे. थायलंडमध्ये ( Thailand) राहणाऱ्या या कपलने 58 तास किस करून अनोखा रेकॉर्ड केला आहे.

एक्कचई आणि लकसाना असे या कपलचे नाव आहे. या दोघांनी 58 तास 35 मिनिटं आणि 58 सेकंद एकमेकांना Kiss करत रेकॉर्ड केला आहे. या कपलने व्हॅलेंटाईन डे ( Valentine’s Day) किस्साथनमध्ये भाग घेतला होता. त्यात त्यांनी हा रेकॉर्ड केला. त्यांनी केलेलं Kiss जगातील आतापर्यंतचं, सर्वाधिक वेळ केलेलं Kiss बोललं जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे या कपलने टॉयलेटमध्ये जातानाही एकमेकांना kiss करणं बंद केलं नव्हतं, त्यामुळेही त्यांचं नाव या रेकॉर्डमध्ये सामिल झाले आहे.

kiss केल्याच्या अनोख्या रेकॉर्डनंतर या कपलला विजेतेपदाची रक्कम म्हणून 2 लाख रुपये रोख आणि दोन हिऱ्याच्या अंगठ्या बक्षीस म्हणून मिळाल्या आहेत.