थायलँडच्या ‘रंगेल’ राजानं पायलट गर्लफ्रेन्डला दिलं जबरदस्त गिफ्ट, तिचे न्यूड फोटो काही दिवसांपूर्वीच झाले होते ‘लीक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – थायलॅंडचा 68 वर्षीय राजा Maha Vijralongkorn हे त्यांच्या शाही राहणीमानासाठी आणि रंगेलपणासाठी नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या गर्लफ्रेन्डमुळे चर्चेत आले असून त्यांनी 32 वर्षीय गर्लफ्रेन्ड Sineenat Wongvajripakdi ला खास गिफ्ट दिले आहे. त्यांनी तिला क्राउन घालून देशाची दुसरी राणी बनवले आहे. वादग्रस्त सिनिनतने 2019 मध्ये राजाच्या पहिल्या राणीच्या राज्याभिषेकातही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला अटकही झाली होती. पण आता तिच दुसरी राणी झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र आता या निर्णयानंतर राजा Maha Vijralongkorn च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सिनिनतला आपल्या शानदार करिअरसोबतच काही वादांचा सामना करावा लागला. तिने थायलॅंडमध्ये एक पायलट म्हणून ट्रेनिंग घेतले आहे. त्यासोबतच तिने थाई किंगच्या रॉयल बॉडीगार्ड यूनिटमध्येही काम केले आहे. 2019 मध्ये तिच प्रमोशन करून मेजर जनरल बनवले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात तिचे काही न्यूड सेल्फी लीक झाल्याने ती चर्चेत आली होती. थायलॅंडच्या राजाच्या ती जवळची असल्याने मुद्दाम तिचे न्यूड फोटो लीक केले होते.

गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत या महिलेबाबत अनेक अफवा परसत होत्या. असे सांगण्यात येत होते की, एकतर तिला तुरूंगात टाकले किंवा तिचा मृत्यू झाला आहे. थायलॅंडच्या राजांना गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेच्या आंदोलनांचा सामना करावा लागत आहे. लोकांनी मागणी आहे की, थायलॅंडच्या राजतंत्रात बदलाची गरज आहे. कोरोना काळातही अनेक लोकांनी राजा विरोधात रस्त्यावर आंदोलने केली. वॅक्सीनला उशीर लागत असल्यानेही त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान रंगेलपणासाठी चर्चेत असणा-या थायलॅंडचा राजा Maha Vijralongkorn ने कोरोना काळातही महिलांची एक खास टीम घेऊन फ्रान्समध्ये जाऊन राहिले होते. याआधी त्यांची तीन लग्ने केली आहेत आणि त्यांना सात अपत्ये आहेत.