व्यक्तीच्या पायांनी जखमी झाले झुरळ, उपचार करून दाखवले मानवतेचे अद्वितीय उदाहरण

नवी दिल्ली – या जगात अनेक लोक असे आहेत जे छोटी-छोटी कामे करून जगभरातील लोकांचे मन जिंकतात. अलिकडेच एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकल्यावर तुम्हाला आनंद होईल आणि हैराण देखील व्हाल. घटना थायलँडची आहे. येथे एका व्यक्तीने झुरळाला Cockroach वाचवण्यासाठी असे काही केले की संपूर्ण जगात त्याची चर्चा होत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, झुरुळ Cockroach घाण पसरवते.

बहुतांश लोक त्याला पाहताच लांब पळण्याचा प्रयत्न करतात, किंवा दिसताच मारून टाकतात.

परंतु थायलँडच्या एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका जखमी झुरळाची मदत केली आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला जनावरांच्या हॉस्पिटलमध्ये नेले.

जाणून घ्या झुरळ वाचले किंवा नाही?

इंग्रजी वेबसाईट टाइम्स नाऊमध्ये प्रसिद्ध बातमीनुसार डॉ. थानु लिम्पापट्टनवानिच थायलँडच्या क्रतुम बेनमध्ये जनावरांचे डॉक्टर आहेत.

मागील आठवड्यात एक व्यक्ती जखमी झुरळ घेऊन आला. त्याने सांगितले की, कुणीतरी चुकीने त्याच्यावर पाय दिला होता, ज्यामुळे ते जखमी झाले आहे, पण तो त्याला मरण्यासाठी सोडून देऊ शकत नव्हता.

डॉ. थानु लिम्पापट्टनवानिच यांनी व्यक्तीला म्हटले की ते झुरळाच्या उपचारासाठी त्याच्याकडून फी घेणार नाहीत.

डॉक्टरांनी हे सुद्धा म्हटले की, झुरळ मरणे आणि जगणे दोन्हीचे चान्स 50-50 होते. डॉक्टरांनी झुरळाला प्राथमिक उपचार दिले, ज्यानंतर स्थिती सुधारल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितले.

मीडियाशी बोलताना डॉक्टर म्हणाले आता याबाबत काहीही माहिती नाही की, आता ते झुरळ वाचले किंवा नाही.

परंतु त्या व्यक्तीची ही कृती सांगते की, तो व्यक्ती जीवांच्या बाबबतीत किती दयाळू आहे.

पृथ्वीवरील प्रत्येक जीवन अनमोल आहे मग तो मनुष्य असो की, छोटा जीव.

 

Pune : सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार; संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी

 

Nutrients For Women : तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 पोषक तत्वांचा करावा समावेश, जाणून घ्या

 

RBI कडून कोटयावधी छोट्या व्यावसायिकांना (MSME) मोठा दिलासा ! कर्जाच्या पुर्नबांधणीची मर्यादा दुप्पटीने वाढली, जाणून घ्या

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

Monsoon 2021 : मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल