‘मॉल’मध्ये घुसून सैनिकानं गोळ्या घालून 26 जणांना संपवलं तर 57 गंभीर, Live केला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओ-चा यांनी सांगितले की, शनिवारी एका मॉलच्या आत घासून अनेक लोकांची हत्या करणाऱ्या सैनिकास ठार करण्यात आले आहे. या सैनिकाने शेकडो लोकांना ओलीस ठेवत एकूण 26 जणांना ठार केले. तो मॉलच्या आत लपला होता. सुमारे 17 तासांच्या कारवाईनंतर सैनिक ठार झाला.

जकरापंथ थोम्मा असे या गोळीबार करणाऱ्यांचे नाव आहे. 32 वर्षीय व्यक्ती सार्जंट मेजर म्हणून तैनात होते. बँकॉकपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा शहरातील टर्मिनल 21 मॉलमध्ये शिपायाने गोळीबार केला. या गोळीबारात सुमारे 57 जण जखमीही झाले. दरम्यान, आपल्या बॅरॅकमधील आर्थिक वादानंतर शिपाई संतप्त झाला. शनिवारी संध्याकाळी 3 वाजता त्याने आपल्या बॅरेकमध्ये गोंधळ सुरू केला आणि कमांडिंग ऑफिसर आणि दुसर्‍या सैनिकाची हत्या केली.

बॅरेकमध्ये गोळीबार झाल्यानंतर तो सैनिक कारमध्ये चढला आणि तेथून पळून गेला. मॉलकडे जाताना वाटेत त्याने एका माणसाच्या घरावर आणि बौद्ध मंदिरावर गोळीबारही केला. मॉलच्या आत या सैनिकाने शंभर लोकांना ओलीस ठेवले होते. शूटआऊट दरम्यान त्याने फेसबुकवर व्हिडिओही शेअर केला होता आणि जळत्या इमारतीच्या समोर उभे राहून सेल्फीही घेतला होता.